आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा
भावनांच्या पानावर
निशब्द कविता
हळव्या मायभूमीवर
आशांचा कोसळता मनोरा
अथांग सागरावर
भयाण लाटा
का दिसतात आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा?
विज्ञाय या संस्कृत शब्दाचा अर्थ "जाणून घेऊन" असा होतो. मन काय म्हणतयं ते जाणून घेऊन जे स्फुरलं ते .....