Pages

Sunday, December 12, 2010

भाव डोळ्यात रिते झाले

भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले

का, केव्हा, कसे
मो शोधत राहिले

कवितेचे पान पुन्हा गहिवरले
सुन्न मनाला आळवू लागले

त्या दिशांचे तराणे
क्षितिजावरच विरले
शब्दांना  खूप वळविले
पण गीत खरे पापणीतून निखळले

शब्द तिथेच थिजले, लाजले
कारण भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले

6 comments:

 1. वा छान. आवडली/

  sudhirkeskarmanogat.blogspot.com

  ReplyDelete
 2. >>शब्दांना खूप वळविले
  पण गीत खरे पापणीतून निखळले

  खुप सुंदर...अप्रतिम..

  ReplyDelete
 3. Very touchy...!!
  Emotions are unveiled in a subtle manner!
  शब्द तिथेच थिजले, लाजले
  कारण भाव डोळ्यात रिते झाले
  But you wrote a whole poem on that!

  ReplyDelete
 4. खूप सुरेख!! फार आवडली!

  ReplyDelete
 5. @sudhirkeskar,Yogesh,Deepali,vaishnavi,
  धन्यवाद!!

  ReplyDelete