Pages

Saturday, July 24, 2010

माझी झाली चारोळी

अतिशय  कमी शब्दांतून  मार्मिक अर्थ व्यक्त करणारी चारोळी मला नेहमीच भुरळ  घालत आली आहे...ती लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

१) माझ्या देशात लोक स्वप्नं जाळतात
त्यावर दु:खाची पोळी भाजतात
आणि पोट भरलं म्हणून
सुखाने झोपतात

२) अवती भवती हिरवळ
पानांची सुमधुर सळसळ
सूर्याचा पहिला किरण
हे स्वप्नच का केवळ ?

३) कित्येक स्वप्नांचा चुरा
इथे रोज होतो
तरीही नव्या आशांचा मनोरा
आम्ही रोज रचतो

४) चार चार ओळी लिहीताना
माझी झाली चारोळी
व्यक्त काही झाले की नाही
मी तोडली चाकोरी 

6 comments:

  1. पहिलाच प्रयत्न का हा? वाटत नाही....खूप सुरेखपणे शब्दांत गुंफलं आहे!

    ReplyDelete
  2. वाह...सुंदर शब्दबद्ध केला आहे...मस्त..मस्त...

    ReplyDelete
  3. ह्या केवळ चार ओळी नाहीत,
    त्या बरंच काही बोलतात;
    मनोरथाचे अश्वच जणू ,
    चौफेर, स्वच्छंद दौडतात.

    ReplyDelete
  4. @vaishnavi,
    हो हा पहिलाच प्रयत्न प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!!

    ReplyDelete
  5. @मनमौजी,
    प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद!!

    ReplyDelete
  6. @CheSa,
    Liked this unique way of commenting!
    या सुंदर चारोळीसाठी मनापासून धन्यवाद!!

    ReplyDelete