Pages

Thursday, January 7, 2010

चार क्षण ऊन

चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन

भरजरी शालीचे
सोनेरी धागे उसवून
मी विणले हे  सक्त धागे कसे कोणास ठाऊक

थंडगार वाऱ्याची झुळ्ळूक आली
पावसाचा शिडकावा घेऊन
मी मात्र पाहीला   
घोंघावणारा वारा आणि लख्खं  ऊन

पाखरांची साद आली
मंजूळ क्षणी गात
मी मात्र ऐकले शांत तटस्थ आगाज...

अशाही रुक्ष वनात तू शोधलेस
दवबिंदू नवलाइचे
तुझ्या पोरकट स्वप्नाने केले
सारे सोहळ्याचे....

चार क्षण पाऊस
चार क्षण  ऊन
दे ना तुझे स्वप्न
देईन माझ्या उशाशी ठेवून...

7 comments:

 1. I really liked this one… Many interpretations are possible and that’s the beauty of this poem. So endearing and touching…….

  ReplyDelete
 2. प्रत्येक कवितेचा असा एक मुड असतो.तसा एक यात जाणवत राहतो,असे दुसर्‍यापर्यंत पोचणे अवघड असते असे मला वाटते.
  खुपच छान,
  अभिनंदन.

  ReplyDelete
 3. धन्यवाद!!
  क्रांति, मंदार,HAREKRISHNAJI,दिपाली,Binary Bandya, आणि Harshad.

  ReplyDelete