Pages

Sunday, January 3, 2010

विरह

धूसर  होणाऱ्या पायवाटा
आणि घननीळ समुद्राचा  आगाज
त्या नीरव  शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे  हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे
पुन्हा तुझ्याच ओढीने
अधीर होणे ....
हे मात्रुभूमी,
तुझा जिव्हारी लागत जाणारा
विरह सहन होत नाही....

3 comments:

  1. अनुजा... जिव्हारी लागली ही कविता. परदेशात आणि तेही समुद्रावर कामानिमित्त जाणे होते माझे तेंव्हा मला पुन्हा एकदा फिट बसली कविता... पण सुट्टीवर मायदेशी येतोय मी उद्या... :)

    ReplyDelete
  2. धन्यवाद!!
    क्रांति!
    रोहन!

    ReplyDelete