Pages

Friday, September 25, 2009

नामशेष शिवतेज

संथ,  तटस्थ, म्लान भयाण आभाळास भेदून
भेसुर वाटणाऱ्या भीषण जगात
सूर्याचे तेज अवतरले
निसटून जाणारी  अस्तित्व गोळा  करणारी
माणसे आणि निष्ठूर हास्यावर गरजले,
स्वत्व विसरलेल्या निर्जीव माणसात
त्याने प्राण फुंकले
अशक्य-प्राय वाटणारे असे सगळे
त्याने केले, या पृथ्वीतलास वाचवण्यासाठी!
हे राज्य व्हावे
या एकाच  उदात्त धेय्याने अख्खे आयुष्य
 थंडी, वारा, तहान भूक विसरुन स्वराज्यसाठी झिजवले ,
त्यामुळे आमचे अस्तित्व आज गवसले,
त्या शिवतेजाने पेटविलेली ठीणगी आजही
असंख्य ह्रुदयांत जळते आहे .....
पण त्याचे उदात्त स्वराज्य मात्र नामशेष होताना
पाहते आहे .....

2 comments:

  1. अनुजा... खरं तरं काय बोलू समजत नाही आहे. कविता वाचल्यावर एकीकडे अभिमानाचे स्फुरण चढते आहे तर अखेर खिन्न देखील वाटते आहे. तुमच्या कवितेने भारावल्यागत झाले एवढे नक्की..

    स्वराज्याच्या विशिष्ट घटनांवर अश्या सुंदर कविता लिहा ना... आवडेल वाचायला...!!!

    ReplyDelete
  2. मनापासुन धन्यवाद!!

    स्वराज्याच्या विशिष्ट घटनांवर कविता लिहिणे....बापरे फारच मोठी जबाबदारी आहे ही...पण हे सुचविल्याबद्दल आभार. मला आवडेल लिहायला. कारण 'इतिहासाच्या साक्षीने ... !' आणि 'Chatrapati Shivaji Maharaj ... !' च्या असंख्य चाहत्यांपैकीच मी एक!

    ReplyDelete